मध्यप्रदेश : बालाघाट येथे 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान
बालाघाट, 02 एप्रिल (हिं.स.) : मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या नक्षलग्रस्त भागात ब
बालाघाट येथे नक्षल्यांकडून जप्त साहित्य


 बालाघाट येथे 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान


बालाघाट, 02 एप्रिल (हिं.स.) : मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या नक्षलग्रस्त भागात बालाघाट पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मध्यरात्री झालेल्या चकमकीत पोलिसांनी 2 नक्षलवादी ठार करत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. काही भागात आणखी नक्षलवादी असण्याची शक्यता असून तेथे चकमक सुरू आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बालाघाट जवळील केझरी जंगलात सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. घटनास्थळी शोधमोहीम राबवली जात आहे. मंगळवारी पहाटे पोलिसांना 2 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये नक्षलवादी नेता डीव्हीसीएम सजंती उर्फ क्रांती, यावर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 29 लाख रुपयांचे बक्षीस होते. हा अनेक घटनांमध्ये सामील होता आणि नक्षलवादी रघू उर्फ शेर सिंग एसीएम, यावर 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. या मृत नक्षलवाद्यांकडून एक एके-47, एक बारा बोअर रायफल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे बालाघाटचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande