अमरावती : रतन इंडियात वेतनाचा मुद्दा ऐरणीवर
अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.) रतन इंडिया कंपनीच्या कामगारांच्या वेदनाचा मुद्दा अधिक क्लिष्ट होत आहे. जे
अमरावती : रतन इंडियात वेतनाचा मुद्दा ऐरणीवर


अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.) रतन इंडिया कंपनीच्या कामगारांच्या वेदनाचा मुद्दा अधिक क्लिष्ट होत आहे. जेव्हा कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात बैठक आयोजित करण्यात येते, तेव्हा एक तर रतन इंडियाचे अधिकारी अनुपस्थित असतात तर दुसरीकडे रतन इंडियाचे अधिकारी अनुपस्थित राहतात. सोमवारी सुद्धा कामगार कार्यालयाने बोलावलेल्या बैठकीला कामगार कार्यालयातील अधिकारीच अनुपस्थित होते. विशेष म्हणजे बैठकीची वेळ माहीत असताना सुद्धा कामगार अधिकारी गायब झाले, तर सहाय्यक कामगार आयुक्त हे सुट्टी टाकून निघून गेले. त्यामुळे कामगार कार्यालयात रतन इंडियाच्या कामगारांचा आक्रोश बघायला मिळाला. विशेष म्हणजे दरवर्षी वेतन निश्चिती पूर्वीच एचआर विभाग प्रमुखांची बदली होते. त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रतन इडिया पावर लिमिटेड कंपनीचे कर्मचारी गत 10 वर्षांपासून वेतनवाढ करिता कामगार कार्यालयात चकरा मारत आहे. कामगारांची बैठक आयोजित केली की एकतर कंपनीचे अधिकारी किंवा कामगार अधिकारी अनुपस्थित राहतात. वेतनवाढीचा मुद्दा वर्षभर रेटुन जेव्हा न्याय मिळेल अशी आशा असते तेव्हाच कंपनीच्या एच आर विभाग प्रमुखांची बदली होते. त्यामुळे कामगारांना पुन्हा एक पासून सुरूवात करावी लागते. गेल्या तीन वर्षापासून वेतन वाढीचा मुद्दा मार्गी लागला की कंपनीच्या वतीने एच आर विभाग प्रमुखाचे बदली करण्यात येते त्यामुळे पुन्हा नवीन येणाऱ्या विभाग प्रमुखाला सर्व समजून घेईल तोवर कामगारांना मात्र न्याय मिळत नाही विशेष म्हणजे येणारा अधिकारी सुद्धा मला काहीच माहित नाही असे उत्तर देतो त्यामुळे कामगार अधिकारी सुद्धा कारवाई न करता फक्त कामगारांना तारीख व तारीख देण्याचे काम करतात कर्मचारी गेल्या तीन वर्षापासून नियमित कामगार कार्यालयाच्या चकरा मारत आहेत मात्र कामगारांना तर दूर अजून पर्यंत कामगार कार्यालयाकडून उत्तरही मिळाले नाही. सोमवारी सुद्धा वेतन निश्चिती करता कामगारांची बैठक उपस्थित करण्याचे पत्र कामगार अधिकाऱ्यांनीच कंपनीचे अधिकारी व कामगारांना दिले याच्यावर डिपार्टमेंट चे प्रमुख सेतू माधवन व गणेश अहिर यांची बदली झाल्याने त्यांनी त्यांची सामान सुद्धा शिफ्ट केले. अशातच मात्र ऐन वेळेवर बैठक असल्याने कामगारांनी त्यांना रोखून धरले होते, मात्र कामगार कार्यालयात उपस्थित झाले असता कामगार अधिकारी महल्ले व काळे गायब दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कंपनीसोबत अधिकाऱ्यानीच आर्थिक साटेलोटे केल्याचा आरोप करीत आक्रोश केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande