बुलडाणा - क्रीडा गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादर सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, 2 एप्रिल, (हिं.स.) माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा देणाऱ्या जिल्हा, विभा
बुलडाणा - क्रीडा गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादर सादर करण्याचे आवाहन


बुलडाणा, 2 एप्रिल, (हिं.स.) माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा देणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त, तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या किंवा सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येते. यासाठी शाळा, महाविद्यालयांनी अर्ज दि. 5 एप्रिल 2024 पर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन, सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव, विहित नमुन्यात अर्ज, हॉल तिकीट, संबंधित खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ठ-ई आदीसह तसेच

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विभागीय, जिल्हास्तरीय प्रमाणपत्र क्रमवार सादर करावेत. प्रत्येक पृष्ठ मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. सेवा हमी कायद्यानुसार ग्रेस गुण देण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सिस्टीम schooleducation.mahaonline.gov.in कार्यरत आहे. राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या, सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण वेबसाईटवर विद्यार्थी, खेळाडूंनी प्रथम आपली नोंदणी करुन क्रीडा गुण सवलतीचा अर्ज, परिक्षेचे हॉल तिकीट आणि खेळाचे प्रमाणपत्र यासोबत अपलोड करणे गरजेचे आहे. सदरच्या प्रस्तावाची हार्डकॉपी किमान 2 प्रतीत सादर करावी लागणार आहे.

क्रीडा स्पर्धा एकविध खेळ संघटनाद्वारे आयोजित केल्या असल्यास, संघटना परिशिष्ट-10 सोबत, विहित नमुन्यात अर्ज, हॉल तिकीट, मान्यताप्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ठ-ई आदीसह संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपूर्ण प्रस्ताव प्रतीत सादर करण्याची मुदत दि. 20 मार्च 2024 पर्यंत होती. मात्र अद्यापपर्यंत संबंधित प्रस्ताव सादर केलेला नसल्यास विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांनी दि. 5 एप्रिल 2024 पर्यंत कार्यलयीन वेळेत दोन प्रतीत आवश्यक कागतपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत वाढीव क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.

तसेच एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हा, विभाग, राज्य क्रीडा स्पर्धांचा अहवाल [email protected] ईमेलवर पाठवावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande