जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप
टोकियो, 02 एप्रिल (हिं.स.) : जपानमध्ये आज, मंगळवारी पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. उत्तर जपान
संग्रहित


टोकियो, 02 एप्रिल (हिं.स.) : जपानमध्ये आज, मंगळवारी पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात हे धक्के जाणवले असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी मोजण्यात आली.

जपानच्या हवामान केंद्रानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रांताचा उत्तरेकडील किनारपट्टीचा भाग होता. सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. हवामान खात्याने सुनामीबाबत कोणताही इशारा दिला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी जपानमध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande