विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार, तिघांवर गुन्हा दाखल
पुणे, 2 एप्रिल (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्या
विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी कड्याने वार, तिघांवर गुन्हा दाखल


पुणे, 2 एप्रिल (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात लोखंडी कड्याने वार केल्याप्रकरणी तीन तरुणांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठातील विधी विभागासमोरील फूड कोर्ट कँटीन शेजारी ही घटना घडली.

याबाबत चैतन्य महेश वाघेलकर (वय २०, सध्या रा. विद्यापीठ होस्टेल, मूळ रा. पनवेल) याने फिर्याद दिली. त्यानुसार अथर्व आल्हाट, वाघेश्वर याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादीच्या मित्राच्या मोबाइलवर अथर्व याने दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी फोन केला आणि त्याला विधी विभागाच्या खाली येण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीसह त्याचे काही मित्र विधी विभागाच्या समोर अथर्व याला भेटायला गेले. तेव्हा अथर्वसह इतर आरोपी तिथे हजर होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande