अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे पालिकेच्या संघाची चमकदार कामगिरी
ठाणे, 2 एप्रिल, (हिं.स.) - तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्यप्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अख
अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे पालिकेच्या संघाची चमकदार कामगिरी


ठाणे, 2 एप्रिल, (हिं.स.) - तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्यप्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या कबड्डी संघांच्या कामगिरीबद्दल आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला व पुरूष कबड्डी संघाचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, क्रीडाअधिकारी तथा प्र.उपआयुक्त मीनल पालांडे, तसेच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे, प्रशिक्षक संतोष शिर्के, पुरूष कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश म्हात्रे, प्रशिक्षक जसपालसिंग राठोड उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande