मीरा सावंत स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेस रत्नागिरीत प्रारंभ
रत्नागिरी, 11 मे, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्य
मीरा सावंत स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा


रत्नागिरी, 11 मे, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात आज रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे झाली.

मीरा वासुदेव सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा प्रारंभ कै. मीरा सावंत यांच्या कन्या ॲड. कल्पलता भिडे व नातू सत्यशील सावंत यांच्या उपस्थितीत झाला.

या प्रसंगी रत्नागिरीसह मंडणगड, राजापूर, देवरूख इत्यादी तालुक्यांतील खेळाडूंसह पालक, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सुभाष शिरधनकर, मंगेश मोडक, सुहास कामतेकर, आयोजक चैतन्य भिडे व इतर बुद्धिबळप्रेमी उपस्थित होते. सौ. कल्पलता भिडे यांनी सत्यशील सावंत यांच्यसोबत पटावर प्रतीकात्मक चाली रचून स्पर्धेचे उदघाटन केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील युवा व शालेय खेळाडूंना क्लासिकल डाव लिहून खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने ही दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीने बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्पर्धा घेतली जाईल. जिल्ह्यातील एकूण बत्तीस बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. बहुतांश ठिकाणी बुद्धिबळाच्या जलद व अतिजलद स्पर्धाच अधिक प्रमाणात चालू आहेत. खेळाडूंना क्लासिकल प्रकारात विचार करायला अधिक वेळ मिळावा व खेळ विकसित व्हावा या हेतूने अशा विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत सातत्याने करण्यात येत असते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande