नाशिक - १२ मे रोजी जिल्हा मल्लखांब स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन
नाशिक, ११ मे, (हिं.स) : नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशनच्या वतीने उद्या रविवार दिनांक १२ मे, २०२
नाशिक - १२ मे रोजी जिल्हा मल्लखांब स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन


नाशिक, ११ मे, (हिं.स) : नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशनच्या वतीने उद्या रविवार दिनांक १२ मे, २०२४ रोजी यशवंत व्यायाम शाळा. महात्मा गांधी रोड, नाशिक येथील मल्लखांब हॉलमध्ये मुले आणि मुलींच्या मिनी आणि सब ज्यूनीयर या दोन वयोगटांसाठी जिल्हा मल्लखांब स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मिनी गटांच्या खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी, १०१२ किंवा त्यानंतरची असावी, तर सब-ज्यूनीयर गटाच्या खेळाडूसाठी जन्म तारीख ०१ जानेवारी, २०१० किंवा त्यानंतरची असावी. उद्या रविवार दुपारी ०४. ०० वाजता या स्पर्धेला आणि निवड चाचणीला सुरवात होणार आहे. या स्पर्धा महाराष्ट्र हौशी मल्लखांब असोसिएशनच्या नवीन नियमावली नुसार घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा आणि निवड चंचणीमधील कामगीरीच्या आधारे प्रत्येक गटातून सहा-सहा खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक २५ आणि २६ मे, २०२४ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चांचणीमध्ये नाशिक जिल्हातर्फे सहभागी होतील अशी माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशनचे सहसचिव यशवंत जाधव यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande