वल्लरीने ताज्या केल्या उन्हाळ्यातल्या सुट्टीच्या आठवणी !
मुंबई, 14 मे (हिं.स.) : शाळेत असताना सर्वजण आतुरतेने वाट पाहतात उन्हाळ्यातल्या सुट्टीची. कोणी गावी ज
वल्लरी विराज


मुंबई, 14 मे (हिं.स.) : शाळेत असताना सर्वजण आतुरतेने वाट पाहतात उन्हाळ्यातल्या सुट्टीची. कोणी गावी जायचं तर कोणी आई- वडीलां सोबत थंडगार ठिकाणी फिरायला जायचं. गावी जाऊन आंबे खाणे, मित्र-मेत्राणी सोबत घड्याळ न पाहता खेळणे ह्या सगळ्या गोष्टी मोठे झाल्यावर एक सुखद आठवणींमध्ये रुपांतरीत होतात. अश्याच काही गोड आठवणी 'नवरी मिळाले हिटलरला' फेम लीला म्हणजेच वल्लरी विराजने सांगितल्या, शाळेत असताना समर वेकेशन मध्ये मी सकाळी लवकर उठून खेळायला जायचे, सायकल चालवायचे, आई मला आणि माझ्या भावाला राणीच्या बागेत आणि नॅशनल पार्कला फिरायला घेऊन जायची. आम्ही उन्हाळाच्या सुट्टीत आज्जीकडे ही राहायला जायचो आणि बर्फाचा गोळा खायचो. सध्या ह्या सगळ्या गोष्टी सांगताना लहानपणाच्या गोड आठवणी डोळ्यासमोर आल्यात. सध्या तर मुंबईत इतकी गर्मी वाढली आहे तेव्हा मी स्वतःची काळजी घेण्यासाठी रात्री पाण्यात किंवा दुधात सब्जा भिजत घालते आणि दिवसभर ते पाणी पिते, दही खाते, लिंबू सरबत ही पिते, बाहेर जाताना डोक्यावर सतत स्कार्फ असतो. सन स्क्रीनचा वापर ही खूप करते कारण अभिनेत्री असल्यामुळे त्वचेची काळजी घ्यावी लागते. ह्या व्यतिरिक्त मी कॉटनचे लूज कपडे घालते जेणे करून ते घाम शोषून घेईल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande