अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे ३१५ जणांचा मृत्यू; मदतीची मागणी
काबुल, १४ मे, (हिं.स) अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला
काबुल 


काबुल, १४ मे, (हिं.स) अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे येथील परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेड्यापाड्यातील शेती, रस्ते, घरे वाहून गेली आहेत आणि पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अफगाणिस्तानातील अनेक राज्यांमध्ये वीज देखील नाही.

अफगाणिस्तानमध्ये गेल्या २ आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बदख्शान, घोर, बागलान आणि हेरात या शहरांमध्ये सर्वाधिक हानी झाली आहे.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनीही पुरामुळे बाधित झालेल्यांसाठी मदतीची मागणी केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande