हिंदु बजेट आणि मुस्लिम बजेट, असं वेगवेगळं होऊ शकतं का? - पंतप्रधान
कल्याण, १५ मे (हिं.स.) : हिंदु बजेट आणि मुस्लिम बजेट, असं वेगवेगळं होऊ शकतं का? मात्र काँग्रेस पक्ष
PM Modi kalyan


कल्याण, १५ मे (हिं.स.) : हिंदु बजेट आणि मुस्लिम बजेट, असं वेगवेगळं होऊ शकतं का? मात्र काँग्रेस पक्ष हे पाप करत होतं, असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. कल्याणमध्ये भाजपा उमेदवार कपील पाटील, शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बुधवारी मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.

जनतेची स्वप्ने हाच मोदींचा संकल्प आहे, माझा एक एक क्षण जनतेसाठीच आहे, 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस मी तुमच्यासोबत असणार आहे. भारत आज ज्या उंचीवर पोहोचला आहे ते म्हणजे एक नवीन विश्वास आणि उमंग आहे. देशाला आणखी पुढे कोण घेऊन जाऊ शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत लाखो जनसमुदायांशी संवाद साधतांना विचारले.

ज्या लोकांनी गरिबी हटवा खोटा नारा दिला. नेहरूंच्या काळापासून ते 2014 गरिबीच्या अफीमची माळ जपत होते. गरिब गरिब गरिब गरिब अशी माळा जपायचे, भ्रष्टाचाराला काँग्रेसने शिष्टाचार बनवलं होतं. तुमचे स्वप्न हे लोक पुर्ण करू शकतात का? मागच्या सरकारमध्ये काँग्रेस हिंदु मुस्लिम करणं फक्त माहिती आहे. मोदी हिंदु मुस्लिमाच्या नावावर राजकारण करत नाही. मी काँग्रेसला चँलेज देतो यांचं उत्तर काँग्रेसनं द्यावं. आई-वडिलांना आठवण्यासाठी अल्बम उघडावे लागत आहेत. तुम्हाला कुणाची आठवण काढण्यासाठी अल्बम लागतो का?

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीला माझा नमस्कार असं म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. या सभेत त्यांनी आनंद दिघे यांचा उल्लेख केला. मी आनंद दिघेंना श्रद्धांजली अपर्ण करतो, असेही मोदी म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande