स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांवर प्राणघातक हल्ला
हल्लेखोराच्या गोळीबारात रॉबर्ट फिको गंभीर जखमी ब्रातिस्लाव्हा, 15 मे (हिं.स.) : युरोपियन देश स्लोव्ह
रॉबर्ट फिको, पंतप्रधान स्लोव्हाकििया


हल्लेखोराच्या गोळीबारात रॉबर्ट फिको गंभीर जखमी

ब्रातिस्लाव्हा, 15 मे (हिं.स.) : युरोपियन देश स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर आज, बुधवारी एका हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडली. यात रॉबर्ट फिको गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार आज, बुधवारी दुपारी पंतप्रधान फिके एका सभेतून बाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. राजधानी ब्रातिस्लाव्हाच्या उत्तर-पूर्वेस सुमारे 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या हँडलोवा शहरात ही घटना घडली. संसदेचे डेप्युटी स्पीकर लुबोस ब्लाहा यांनी सांगितले की, फिको बैठकीनंतर आपल्या कारमध्ये बसणार असताना त्यांना गोळ्या घातल्या. या गोळीबारात फिको जखमी झालेत. एका साक्षीदाराने सांगितले की त्याने गोळीबाराचे आवाज ऐकलेत. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर पोलिसांना एका व्यक्तीला ताब्यात घेताना त्याने पाहिले. हँडलोवा शहरातील हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर फिको यांच्यावर 4 गोळ्या झाडल्या गेल्या, यात 59 वर्षीय पीएम फिको जखमी झाले. त्याच्या पोटात गोळी लागली. पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे. फिको यांना रशियाचे समर्थक मानले जाते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पीएम फिको बैठकीनंतर हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर लोकांशी बोलत होते, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळी लागताच ते जमिनीवर पडले. त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला जागेवरच पकडले. हल्लेखोराने गोळीबार का केला याबाबत सध्या कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande