वाढदिवसाच्या दिवशी अमोलला मिळेल का बाबांची भेट ?
मुंबई, 15 मे, (हिं.स.) 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनच नातं फुलत असताना प
वाढदिवसाच्या दिवशी अमोलला मिळेल का बाबांची भेट ?


मुंबई, 15 मे, (हिं.स.) 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनच नातं फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तशी त्या दोघांची मैत्री ही मजबूत होताना दिसत आहे. अमोलशी बोलल्याने अर्जुनच्या मनातील कडवटपणा कमी होऊ लागलाय आणि तो अप्पीला एक संधी देण्याचं ठरवतो. त्यासाठी अर्जुन अप्पीच्या घरी भेटीला गेला असता त्याला तिकडे आलेले सरकार आणि रुक्मिणी दिसतात आणि त्याची तळपायाची आग मस्तकात जाते, अप्पी अजूनही तशीच आही हे कळताच तो मागे फिरतो. इकडे अमोलचा वाढदिवस जवळ आला आहे आणि अप्पीची इच्छा आहे की अर्जुनला अमोलच्या वाढदिवसाला बोलवावं. ती त्यासाठी तयारी करते, आणि गायतोंडेला अर्जुनची माहिती काढायला सांगते. अर्जुन आणि अमोलची मैत्री वाढत चालली आहे. अमोल आईने दिलेला डब्बा अर्जुनला खायला लावतोय आणि स्वतः आवडीच चायनीज,पिझ्झा आणि बर्गर खातो. अर्जुन त्याचे सगळे लाड पुरवतोय. अमोलच्या वाढदिवसादिवशी मात्र अप्पी अमोलला त्याच्या बाबाबद्दल सगळं सांगते, तो कसा होता ? त्यांचं नातं कस होत ? पण अप्पी, अमोलला वाढदिवसाला अर्जुनच त्याचा बाबा आहे हे सांगू शकेल ?

हे जाणून घेण्यासाठी बघत राहा 'अप्पी आमची कलेक्टर' दररोज संध्या ७ वा. फक्त झी मराठीवर.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande