इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मिडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक - क्षीरसागर
मुंबई, 15 मे, (हिं.स.) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभ
इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मिडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक - क्षीरसागर


मुंबई, 15 मे, (हिं.स.) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मिडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) ची आठवी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, समिती सदस्य निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, समाजमाध्यम तज्ञ प्रा अभिजित पाटील, श्री प्रसाद कुलकर्णी, माहिती व प्रसारण मंत्रालयातील अधिकारी वैशाली त्रिवेदी, स्वतंत्र पत्रकार/माध्यम तज्ञ- श्री राजेंद्र हुंजे, श्री पंकज दळवी, मनिषा रेगे, श्री दीपक चव्हाण, श्री गोपाळ साळुंखे, श्रद्धा मेश्राम, जयश्री कोल्हे, वैदेही खडसे तसेच सदस्य सचिव तथा माध्यम समन्वयक केशव करंदीकर हे उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) ने १५ मे २०२४ अखेर दाखल ३० प्रकरणे प्रमाणित करून दिली आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande