पवईच्या जंगलातील छाप्यात हातभट्टीचे साहित्य जप्त
मुंबई उपनगर, 15 मे, (हिं.स.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २९ – मुंबई उत्तर मध्यच
पवईच्या जंगलातील छाप्यात हातभट्टीचे साहित्य जप्त


मुंबई उपनगर, 15 मे, (हिं.स.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २९ – मुंबई उत्तर मध्यचे खर्च निरीक्षक सुरजकुमार गुप्ता यांच्यासह अधिकाऱ्यांनी पवईच्या जंगलात हातभट्टी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांवर छापा टाकून ३४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक दोन, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

खर्च निरीक्षक श्री. गुप्ता, समन्वय अधिकारी सतीश देवकाते, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे, भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक अनिल पवार यांच्यासह निरीक्षक बाळासाहेब नवले, प्रफुल्ल भोजने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक राहुल राऊळ, स्वप्नाली पाटील, विशाल शितोळे, मनोज होलम, जवान प्रदीप अवचार, श्री. काठोळे, श्री. सावळे, श्री. खंडागळे, श्री. दळवी यांनी साई बांगोड गावालगत असलेल्या जंगल परिसरात असलेल्या हातभट्टी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांवर छापे टाकून दोन गुन्हे नोंदविले. एकूण ३४७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याचे भरारी पथक प्रमुख यांनी कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande