महादेव बेटिंग अॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक
पुणे, 15 मे (हिं.स.) देशभर गाजत असलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी नारायणगाव येथे पुणे ग्रामीण पोलिसा
महादेव बेटिंग अॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक


पुणे, 15 मे (हिं.स.) देशभर गाजत असलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी नारायणगाव येथे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पाेलिसांनी नारायणगाव येथील एका मोठ्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंध असणाऱ्या सुमारे 70 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

महादेव बेटिंग प्रकरण समोर आले तेव्हा देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती. आता याच प्रकरणी नारायणगावात पोलिसांनी कारवाई करत याचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आणले आहे.दरम्यान पोलिसांनी केलेल्या छापेमारीनंतर समोर आले की, या महादेव बेटिंगचे काम नारायणगावातील एका इमारतीमध्ये सुरु हाेते. पोलिसांनी छापा टाकलेली संपूर्ण संपुर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरत असल्याची माहिती समाेर आली आहे. यावेळी पोलिसांनी या इमारतीत काम करणारे 70-80 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande