नायजेरियातील गोळीबारात ४० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली, २२ मे, (हिं.स) आफ्रिकन देश नायजेरियातील एका गावात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ४० ज
नायजेरियातील गोळीबारात ४० जणांचा मृत्यू


नवी दिल्ली, २२ मे, (हिं.स) आफ्रिकन देश नायजेरियातील एका गावात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ४० जणांचा मृत्यू झाला. नायजेरियाच्या उत्तर-मध्य भागात असलेल्या पठार राज्यात ही घटना घडली. हल्लेखोरांनी आधी येथील नागरिकांच्या घरांना आग लावली त्यानंतर गोळीबार केला.

घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सात हल्लेखोरांना ठार केले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande