पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू
पोर्ट मोरेस्बी, २५ मे, (हिं. स) - ऑस्ट्रेलिया देशाच्या जवळ बेटांचा देश असणार्या पापुआ न्यू गिनी येथ
पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू


पोर्ट मोरेस्बी, २५ मे, (हिं. स) - ऑस्ट्रेलिया देशाच्या जवळ बेटांचा देश असणार्या पापुआ न्यू गिनी येथील काओकलाम गावात झालेल्या भूस्खलनामध्ये १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे घडल्यामुळे अनेक जण गाढ झोपेत होते. त्यामुळे बरेच जण जमिनी खाली गाडले गेले आहेत. अद्याप शोध मोहीम सुरू आहे.भूस्खलनामुळे काओकलाम गावातून शहराकडे जाणारा रस्ताही बंद झाला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande