आयपीएल 2024 : हंगामासाठी तब्बल 46 कोटी रुपये बक्षिसांची रक्कम
* अंतिम सामन्यासह हंगामातील अव्वल खेळाडू * महाविजेता केकेआरला 20 कोटी, उपविजेत्या संघाला 12.5 कोटी
IPL 2024


* अंतिम सामन्यासह हंगामातील अव्वल खेळाडू * महाविजेता केकेआरला 20 कोटी, उपविजेत्या संघाला 12.5 कोटी

मुंबई, २७ मे (हिं.स.) : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 स्पर्धेत तब्बल 74 सामने झाले. त्यानंतर रविवारी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला अंतिम सामन्यात विजेतेपेदावर आपले नाव कोरले.

यंदाच्या आयपीएल हंगामासाठी तब्बल 46.5 कोटी रुपयांची बक्षिसांची रक्कम होती. यातील 20 कोटी रुपये विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला देण्यात आले, तर उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाला 12.5 कोटी रुपये देण्यात आले.

आयपीएल 2024 मधील सर्वोत्तम खेळाडू सुनील नारायण ठरला. त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. विशेष म्हणजे रविवारी त्याचा वाढदिवसही होता. त्याने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांत 488 धावा केल्या, तर 17 गडी बाद केले. त्याचबरोबर विराट कोहलीला सर्वाधिक 741 धावा करण्यासाठी ऑरेंज कॅप देण्यात आली, तर सर्वाधिक 24 गडी बाद करणाऱ्या हर्षल पटेलला पर्पल कॅप देण्यात आली. सनरायझर्स हैदराबाद संघाने फेअर प्ले पुरस्कारही जिंकला. या विजेत्यांनाही प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस देण्यात आले.

आयपीएल अंतिम सामन्यातील पुरस्कार विजेते आणि बक्षीस रक्कम

अंतिम सामन्यातील सामनावीर - मिचेल स्टार्क (कोलकाता नाईट रायडर्स) - 5 लाख, अंतिम सामन्यातील इलेक्ट्रिक स्ट्रायकर - वेंकटेश अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख, अंतिम सामन्यातील सर्वाधिक चौकार - रेहमनुल्लाह गुरबाज (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख, अंतिम सामन्यातील सर्वाधिक षटकार - वेंकटेश अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख, अंतिम सामन्यातील अल्टिमेट फँटेसी प्लेअर - मिचेल स्टार्क (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख, सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज - हर्षित राणा (कोलकाता नाईट रायडर्स) - 1 लाख

आयपीएल 2024 हंगामाचे पुरस्कार

विजेता - कोलकाता नाईट रायडर्स (20 कोटी), उपविजेता - सनरायझर्स हैदराबाद (12.5 कोटी), उदयोन्मुख खेळाडू - नितीश रेड्डी (सनरायझर्स हैदराबाद) - 10 लाख, इलेक्ट्रिक स्ट्रायकर - जॅक-फ्रेझर मॅकगर्क (दिल्ली कॅपिटल्स) - 10 लाख, अल्टिमेट फँटेसी प्लेअर - सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) - 10 लाख, व्हॅल्युएबल प्लेअर (मालिकावीर) - सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) - 10 लाख, सर्वाधिक चौकार - ट्रेविस हेड (सनरायझर्स हैदराबाद, 64 चौकार) - 10 लाख, सर्वाधिक षटकार - अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद, 42 षटकार) - 10 लाख, सर्वोत्तम झेल - रमणदीप सिंग (कोलकाता नाईट रायडर्स) - 10 लाख, ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - 10 लाख, पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - हर्षल पटेल (पंजाब किंग्स) - 10 लाख, फेअर प्ले - सनरायझर्स हैदराबाद - 10 लाख, सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान - राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद - 50 लाख

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande