भंडारा - वाटेत लुटमार करणाऱ्या दोघांना गावकऱ्यांनी दिला चोप
भंडारा, २८ मे, (हिं.स) - भंडारा जिल्ह्यात लूटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. भंडारा ताल
भंडारा - वाटेत लुटमार करणाऱ्या दोघांना गावकऱ्यांनी दिला चोप


भंडारा, २८ मे, (हिं.स) - भंडारा जिल्ह्यात लूटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. भंडारा तालुक्यातील सालेबर्डी हद्दीत येणा-या जाणाऱ्या लोकांना चाकूचा धाक दाखवून दोन इसम लुटमार करत होते. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. काल रात्री गावकऱ्यांनी प्लॅन करत या चोरट्यांना पकडुन चांगलाच चोप दिला. याची माहिती कारधा पोलिसांना होताच पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली. तर एक चोरटा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande