दिल्लीत 52.3 अंश तापमानाची नोंद
नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : राजधानी दिल्लीत आज, बुधवारी उष्णतेने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले. हवाम
संग्रहित


नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : राजधानी दिल्लीत आज, बुधवारी उष्णतेने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या मंगेशपूरमध्ये 52.3 अंश तापमानाची नोंद करण्यात आली . मुगेशपूरमध्ये बुधवारी दुपारी 2.30 वाजता 52 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. दिल्लीतील मंगेशपूरमध्ये जेव्हा तापमान 52.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले तेव्हा त्यावेळचे सरासरी तापमान 45.8 अंश होते.

यापूर्वी मंगळवारी दिल्लीत अतिशय तीव्र उष्णता दिसून आली आणि दिल्लीतील तापमान 50 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले होते. हवामान खात्याने बुधवारी सांगितले की, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील उष्णतेच्या लाटेपासून तीव्र उष्णतेच्या लाटेपर्यंतची परिस्थिती 30 मे पासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी 31 मे रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्लीच्या काही भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की 1 जून 2024 रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande