उत्कंठा शिगेला; सकाळी आठ वाजेपासून सुरु होणार मतमोजणी
अमरावती, 29 मे, (हिं.स.) - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख तसजशी जवऊ येऊ लागली आहे. तसतशी सर्वां
उत्कंठा शिगेला; सकाळी आठ वाजेपासून सुरु होणार मतमोजणी


अमरावती, 29 मे, (हिं.स.) - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख तसजशी जवऊ येऊ लागली आहे. तसतशी सर्वांची उत्कंठा वाढू लागली आहे. ४ जूनला सकाळी आठ वाजेपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंतच चित्र स्पष्ट होऊ शकते. अमरावती लोकसभा निवडणूक हि दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला पार पडली.

यावेळी झालेल्या निवडणुकीत ६७.०४ टक्के मतदान झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार करता सर्वांत कमी मतदान बडनेरा मतदारसंघात झाले आहे.तर मेळघाट मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ६,३१,९१५ पुरुष व ५,३७,१८६ महिला व २० इतर अशा एकूण ११,६९,१०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही ६३.६७ टक्केवारी आहे. यावेळी सर्वाधिक मतदान झाले.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक फेरीनंतर मतदान किती झाले, कोणी किती मते घेतली, याची उद्घोषणा केली जाणार आहे.

निकालाला घेऊन वाढली उत्सुकता

■ निवडणुकीनंतर तब्बल दीड महिन्यानंतर ४ जूनला मतमोजणी होत आहे. मत- मोजणीसाठी आता केवळ ६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. जसा जसा मतमोजणीचा दिवस जवळ येत आहे तस तशी मतदारांची उत्सुकता वाढत आहे. तर दुसरीकडे उमेदवारांची धाकधूक वाढत असल्याचे चित्र आहे.

सट्टाबाजारात चढ-उतार

■ लोकसभा निवडणूक निकालाला घेऊन सट्टाबा- जारात ही चढ उतार दिसून येत आहे. विशेष म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार वरचढ ठरेल यावरून सट्टा बाजारातही संभ्रमाचे वातावरण आहे. तर भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास आहे. पण मतदारांनी आपला कॉल कुणाला दिला हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande