द.आफ्रिकेत प्रवाशांना घेऊन जाणारे विमान धावपट्टीवरुन कोसळले, 10 जण जखमी
नवी दिल्ली, 9 मे, (हिं.स.) दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग 737 विमान धाव
नवी दिल्ली


नवी दिल्ली, 9 मे, (हिं.स.) दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग 737 विमान धावपट्टीवरून कोसळल्याचे वृत्त आहे. या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानातून एकूण ७८ प्रवासी प्रवास करत होते. टेक-ऑफ करताना विमानाच्या डाव्या पंखाला आणि इंजिनला आग लागली.

या घटनेनंतर सेनेगलची राजधानी डकारजवळील मुख्य विमानतळावरील उड्डाणे बंद करण्यात आली .

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande