फ्रान्स अध्यक्षांनी घेतला संसद बरखास्तीचा निर्णय
* ३० जून आणि ७ जुलै रोजी मतदान पॅरिस, १० जून (हिं.स.) : युरोपीयन युनियनच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये
French president Emmanuel Macron


* ३० जून आणि ७ जुलै रोजी मतदान

पॅरिस, १० जून (हिं.स.) : युरोपीयन युनियनच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रोन यांच्या पक्षाची खराब कामगिरी राहिली. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रोन यांनी देशाची संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

एक्झिट पोलनुसार, रविवारी झालेल्या युरोपियन संसदीय निवडणुकीत मॅक्रॉन यांच्या रिनेसन्स पक्षाचा (Renaissance Party) मरीन ले पेनच्या उजव्या पक्षाच्या नॅशनल रॅली पक्षाचाकडून पराभव होत आहे. ही मतं मॅक्रोन यांच्या पक्षाला मिळालेल्या मतांपेक्षा दुप्पट आहेत. मॅक्रोन यांच्या पक्षाला केवळ १५.२ टक्के मतं मिळाली आहेत. सोशलिस्ट पक्षाला १४.३ टक्के मतं मिळाली आहेत.

मॅक्रोन यांनी एक्झिट पोलनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा केली. फ्रान्समध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. ३० जून आणि ७ जुलै रोजी मतदान होईल.

मॅक्रोन म्हणाले की, 'माझा निर्णय धोकादायक आहे. पण, विश्वास महत्त्वाचा आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे. मतदार नागरिक योग्य निर्णय घेतील हे मला माहिती आहे.

फ्रान्समध्ये ५७७ जागांसाठी कनिष्ठ सभागृहातील सदस्य निवडीसाठी मतदान होईल. फ्रान्समध्ये संसद आणि अध्यक्षपदाच्या वेगवेगळ्या निवडणुका होत असतात. त्यामुळे संसदेच्या निवडणुका होत असल्या तरी मॅक्रोन यांच्या पदाला कोणताही धोका नाही. २०२७ पर्यंत ते अध्यक्षपदावर कायम असणार आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande