मोदी ३.० खातेवाटप : संरक्षण, गृह-सहकार, अर्थ, परिवहन, रस्ते विकास, रेल्वे, परराष्ट्र मंत्री पदे जैसे थे...
- पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घरे आणि शेतकरी यांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.
मोदी मंत्रिमंडळ


- पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घरे आणि शेतकरी यांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि मोदी ३.० कार्यकाळ सुरू झाला. यात मोदी यांच्यासह एनडीएच्या जवळपास ७० खासदारांनी मंत्रिपदाची आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर नवीन खातेवाटप जाहीर झाले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचा पदभार स्विकारला आणि दुसरीकडे देशाच्या केंद्रीय कॅबिनेटची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ३ कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय झाला. यापूर्वी ४.२१ कोटी घरे बांधली गेली आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या कार्यकाळातील पहिली स्वाक्षरी शेतकऱ्यांसाठी केली. त्यानुसार, देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान निधीचा १७वा हफ्ता पाठवण्यात आला.

यासोबतच मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर झाले आहे. यात आधीच्या कार्यकाळातील मंत्र्यांची खाती त्यांच्याकडेच तशीच राहिल्याचे दिसून आले आहे.

तपशील पुढीलप्रमाणे : राजनाथ सिंह – संरक्षण, अमित शाह – गृह आणि सहकार, निर्मला सीतारमण – अर्थ, अश्विनी वैष्णव – रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एस. जयशंकर – परराष्ट्र, नितीन गडकरी - परिवहन, रस्ते विकास, पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग, मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास, शिवराज सिंह चौहान – कृषी आणि किसान कल्याण, पंचायत तथा ग्रामविकास, जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग, सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय, जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय, चिराग पासवान - अन्न प्रक्रिया, किरेन रिजिजू – संसदीय कार्य, मनसुख मांडविया – कामगार आणि क्रिडा, अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास, राम मोहन नायडू – नागरी उड्डाण, सर्वानंद सोनोवाल – बंदर व जलवाहतूक, धर्मेंद्र प्रधान – शिक्षण, एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग, ज्योतिरादित्य सिंधिया – दूरसंचार आणि ईशान्य भारत विकास, भूपेंद्र यादव -पर्यावरण, वन आणि हवामान बदल, प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण, गजेंद्र शेखावत – पर्यटन, सांस्कृतिक, रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक, राजीव रंजन सिंह - पंचायत राज, मत्स्योत्पादन, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, डाॅ. विरेंद्र कुमार - सामाजिक न्याय, जुएल ओरम - आदिवासी विकास, गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग, हरदीप सिंग पुरी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, जी. किशन रेड्डी - कोळसा आणि खाणी

स्वतंत्र कारभार राज्यमंत्री

डाॅ. जितेंद्र सिंह - विज्ञान-तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, अर्जुन राम मेघवाल - विधी आणि न्याय, संसदीय कार्य, प्रतापराव जाधव - आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, जयंत चौधरी - कौशल्य विकास, शिक्षण

राज्यमंत्री

जितिन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्राॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, श्रीपाद नाईक – ऊर्जा, पंकज चौधरी - वित्त, क्रिशन पाल - सहकार, रामदास आठवले - सामाजिक न्याय, राम नाथ ठाकूर - कृषी आणि कुटुंब कल्याण, नित्यानंद राय - गृह, अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायन आणि खते, व्ही. सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे, डाॅ. चंद्र सेखर पेम्मासानी - ग्रामविकास आणि दळणवळण, एस.पी. सिंग बघेल - मत्स्योत्पादन, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पंचायत राज, शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, किर्तीवर्धन सिंग - पर्यावरण, वने, हवामान बदल, परराष्ट्र, बी.एल. शर्मा - ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा, शांतनू ठाकूर – बंदर व जलवाहतूक, सुरेश गोपी – पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, पर्यटन, डाॅ. एल. मुरुगन - माहिती आणि प्रसारण, संसदीय कार्य, अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री, हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते, बंडी संजय कुमार - गृह, कमलेश पासवान - ग्रामविकास, भगीरथ चौधरी - कृषी, कुटुंब कल्याण, सतीश चंद्र दुबे - कोळसा, खाणी, संजय सेठ - संरक्षण, रवनीत सिंग - अन्न प्रक्रिया उद्योग, रेल्वे, दुर्गादास उईके - आदिवासी विकास, रक्षा खडसे - युवा विकास आणि क्रीडा, सुकांता मजुमदार - शिक्षण, ईशान्य भारत विकास, सावित्री ठाकूर - महिला आणि बाल विकास, टोखान साहू - शहर विकास, गृहनिर्माण, राज भूषण चौधरी - जलशक्ती, भूपथी राजू श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग, स्टील, हर्ष मल्होत्रा - सहकार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, निमुबेन बंभानिया - ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा, मुरलीधर मोहोळ - सहकार, नागरी उड्डाण

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील दोन खासदारांना कॅबिनेटमंत्री करण्यात आलं आहे. तर ४ खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामध्ये एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. तर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande