सातारच्या जलतरणपटूंचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत यश
सातारा, 10 जून (हिं.स.) : येथील श्याम सुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के.एस.डी. शानभाग व
जलतरणपटूंचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत यश


सातारा, 10 जून (हिं.स.) : येथील श्याम सुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि कला ,वाणिज्य व विज्ञान शाखेच्या महाविद्यालयाचे खेळाडूंनी नुकत्याच सातारा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विशेष यश मिळवले आहे. सातारा येथे संपन्न झालेल्या जलतरण स्पर्धा या एजे ग्रुप सातारा यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे नुकत्याच संपन्न झाल्या.

या स्पर्धेत विद्यालयाच्या इयत्ता आठवी शिकणाऱ्या कु.आरोही रणजीत यवतकर हिने 100 मीटरची स्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक, 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात पहिला क्रमांक तसेच 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला. 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात पहिला नंबर मिळवून 150 मीटर बटरफ्लाय प्रकारात पहिला क्रमांक मिळवून अठरा वर्षाखालील गटामध्ये तिने हे जलतरणातील विशेष यश मिळवले .

याच विद्यालयाचा इयत्ता चौथी शिकणाऱ्या ऋशांत रणजीत यवतकर याने 25 मीटर किक बोर्ड या प्रकारात प्रथम क्रमांक पन्नास मीटर फ्रीस्टाइल प्रकारात प्रथम क्रमांक 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक, तसेच 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात पहिला क्रमांक मिळवला. याच विद्यालयाच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या कु.चित्राणी मुकुंद नवले या खेळाडूने 100 मीटर फ्री स्टाइल प्रकारात पहिला क्रमांक ,50 मीटर फ्री स्टाइल प्रकारात पहिला क्रमांक, 50 मीटर बॅकस्टोक प्रकारात पहिला क्रमांक, तसेच 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात पहिला क्रमांक मिळवून विशेष यश मिळविले.

इयत्ता आठवी शिकणाऱ्या अर्णव किरण गायकवाड याने 100 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला. तर इयत्ता आठवीतील रुद्र गणेश पिंपळे याने 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला.

या सर्व विजेत्या जलतरण स्पर्धकांना संयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात आले .जलतरण खेळामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व खेळाडूंना रवी नाटेकर यांनी प्रशिक्षक म्हणून सुरेख मार्गदर्शन केले .

या सर्व जलतरण खेळाडूंचे विद्यालय व महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग ,संस्थेच्या संचालिका आचल घोरपडे ,विश्वस्त उषा शानभाग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा गायकवाड ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक- शिक्षकांसह, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande