वडनेर दुमालात तलवारधारी दोघांना अटक
नाशिक, १० जून (हिं.स.) - वडनेर दुमाला येथील वारकरी चौकात तलवारी घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन युवकांना ग
वडनेर दुमालात तलवारधारी दोघांना अटक


नाशिक, १० जून (हिं.स.) - वडनेर दुमाला येथील वारकरी चौकात तलवारी घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन युवकांना गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनीट दोनच्या गुन्हे शाखेचे पोलीस नितीन फुलमाळी आणि संजय पोटींदे यांना करण बाळू शेखरे (२५) व चेतन संजय पवार उर्फ सॅन्डी (२०, दोघे रा. वडनेर दुमाला, हनुमान मंदिराजवळ) हे दोन युवक वडनेर दुमाला येथील वारकरी चौकात तलवारी घेऊन दहशत माजवत असल्याचे समजले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून या समाजकंटकांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ धारधार तलवारी सापडल्या. त्या जप्त करण्यात आल्या.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande