भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सवाची संगीतमय वातावरणात सांगता
पुणे, 10 जून (हिं.स.) : नाट्यगीत, अभंग, शास्त्रीय गायन, सतार-व्हायोलिन जुगलबंदी, सहगायन अशा विविध सा
 संगीतमय वातावरणात सांगता


पुणे, 10 जून (हिं.स.) : नाट्यगीत, अभंग, शास्त्रीय गायन, सतार-व्हायोलिन जुगलबंदी, सहगायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२४’ संगीतमय तसेच उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात संगीत अकादमीचे संगीत शिक्षक नंदिन सरीन यांच्या सुरेल अशा शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी सुरूवातीस ‘पुर्याधनाश्री’ हा राग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी विष्णू कुलकर्णी यांनी तबल्याची तर दिवीज टकले यांनी हार्मोनियमची सुरेख अशी साथसंगत दिली.

त्यानंतर कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी यांच्या जसरंगी शास्त्रीय सहगायनाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबल्याची साथसंगत रामकृष्ण करंबेळकर आणि आशय कुलकर्णी यांनी दिली. तसेच हार्मोनियमची साथ आभिषेक शिनकर आणि निरंजन लेले यांनी दिली. यावेळी कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी यांच्या सहगायनाने श्रोत्यांच्या मनात घर केले.

यानंतर झालेल्या विदुषी देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक श्रोते भारावून गेले. त्यांनी यावेळी राग ‘नंद’ आणि राग ‘देस’ सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शेवटी त्यांनी एक चैती सादर करून महोत्सवाची शोभा वाढविली. विदुषी देवकी पंडित यांना तबल्याची साथसंगत प्रशांत पांडव यांनी तर हार्मोनियमची साथ मिलींद कुलकर्णी यांनी दिली.

महोत्सवाची सांगता पंडित रघूनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात ‘संपुर्ण मालकंस’ या रागाने केली. यावेळी त्यांना तबल्याची साथ भरत कामत यांनी दिली तर हार्मोनियमची साथ सुयोग कुंडनकर यांनी दिली.

यावेळी सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रिडा पर्यवेक्षक अरूण कडूस, समन्वयक समीर सुर्यवंशी तसेच रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी तर उपस्थितांचे आभार महोत्सव समन्वयक समीर सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, अरूण कडूस, समीर सुर्यवंशी, स्मिता देशमुख, उमेश पुरोहित, संतोष साळवे, विनोद सुतार यांनी परिश्रम घेतले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande