दौंड तालुक्यात घोरपडीच्या शिकारीसाठी आलेल्या दोन शिकाऱ्यांना अटक
पुणे, 10 जून (हिं.स.) गोपाळवाडी (ता. दौंड) येथील वनक्षेत्रात घोरपडीच्या शिकारीसाठी आलेल्या दोन शिका
दौंड तालुक्यात घोरपडीच्या शिकारीसाठी आलेल्या दोन शिकाऱ्यांना अटक


पुणे, 10 जून (हिं.स.)

गोपाळवाडी (ता. दौंड) येथील वनक्षेत्रात घोरपडीच्या शिकारीसाठी आलेल्या दोन शिकाऱ्यांना वन विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक जिवंत घोरपड जप्त करण्यात आली आहे. या दोघा शिकाऱ्यांनी वनक्षेत्रात एका सशाची शिकार केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गोपाळवाडी येथील राखीव वनक्षेत्र परिसरात दोन इसमांनी एक जिवंत घोरपड पकडल्याची माहिती वन अभ्यासक प्रल्हाद जाधव यांना मिळाली होती. त्यांनी त्याविषयी दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना कळविले. वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविलेल्या शोध मोहिमेत गोरख अंबादास जाधव (५७ , रा. पोथरे , ता. करमाळा, जि. सोलापूर) व भरत जनार्दन जाधव (३४, रा. पिंपरखेड , ता. आष्टी, जि. बीड) या दोन शिकाऱ्यांना एका जिवंत घोरपडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांनी एका सशाची शिकार केल्याचे आढळून आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande