सोलापूर - महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांसाठी शिबीराचे आयोजन
सोलापूर, 11 जून, (हिं.स.) विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे प्रमाणपत्र
सोलापूर - महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांसाठी शिबीराचे आयोजन


सोलापूर, 11 जून, (हिं.स.) विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर तसेच इतर शैक्षणिक दाखल्यांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिनांक 11 ते 14 जून 2024 या कालावधीत दाखल्या विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार किरण जमदाडे यांनी दिली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत चार ठिकाणी शिबीराचे आयोजन केले असुन, दिनांक 11 ते 12 जून 2024 रोजी एस.व्ही.सी.एस. बोरामणी, शंकरलिंग प्रशाला, वळसंग , कोनापूरे प्रशाला, आहेरवाडी तसेच दिनांक 13 ते 14 जून 2024 रोजी सोनटक्के प्रशाला, तांदुळवाडी या ठिकाणी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत होणार आहे.

या शिबीरासाठी 01 नायब तहसिलदार, 04 मंडळ अधिकारी, 18 तलाठी, 01 कार्यालयीन कर्मचारी तसेच 25 महा ई सेवा- केंद्रचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिबीरास जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहून, आवश्यक शैक्षणिक दाखले प्राप्त करुन घ्यावेत असे आवाहनही तहसिलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande