खासगी हाॅस्पिटलचे अवाजवी बिल; पुणे महापालिकेचा टोल फ्री नॉट रिचेबल
पुणे, 11 जून, (हिं.स.) खासगी हॉस्पिटलकडून आकारले जाणारे अवाजवी बिल, रुग्ण हक्कांची हाेत असलेली पायम
खासगी हाॅस्पिटलचे अवाजवी बिल; पुणे महापालिकेचा टोल फ्री नॉट रिचेबल


पुणे, 11 जून, (हिं.स.) खासगी हॉस्पिटलकडून आकारले जाणारे अवाजवी बिल, रुग्ण हक्कांची हाेत असलेली पायमल्ली, उपचारांची दरपत्रके आदी नियमबाह्य गाेष्टींची तक्रार करण्यासाठी असलेल्या महापालिकेचा टाेल फ्री क्रमांकावर गेल्या पाच महिन्यांपासून काेणीही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे रुग्णांना तक्रार करता येत नसून त्यामुळे खासगी रुग्णालयांचे फावते आहे. तर याकडे महापालिकेच्या आराेग्य विभागाचेही ‘साेईस्कर’ दुर्लक्ष हाेत आहे.

खासगी रुग्णालयांच्या चुकीच्या कृत्यांबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्यावर्षी २०१३ मध्ये एप्रिल महिन्यात एक तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. त्याचा टाेल फ्री क्रमांक १८००२३३४१५१ हा असा असून ताे कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ पर्यंत कार्यान्वित राहील असे सांगण्यात आले हाेते. या क्रमांकावर फोनवरूनही तसेच प्रत्यक्षातदेखील तक्रार दाखल करता येते. त्यावर फाेन करून अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारीची नाेंद केली हाेती. त्याची नाेंद करून ती तक्रार साेडवण्याचे महापालिकेच्या आराेग्य विभागाचे काम आहे. या तक्रार निवारण कक्षासाठी आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या आरोग्य कार्यर्त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande