अश्विनी वैष्णव यांनी मानले मोदींचे आभार
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.) : माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, मंगळवारी मंत्रालयाच
अश्विनी वैष्णव


नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.) : माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, मंगळवारी मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर वैष्णव म्हणाले की, जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवा करण्यासाठी आशीर्वाद दिला आहे.

ते म्हणाले की, सोमवारी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी गरीब आणि शेतकऱ्यांना समर्पित निर्णय घेतला. त्यांनी तरुणांसाठी खूप मजबूत पाया रचला आहे. पंतप्रधान मोदींना मंत्री करण्यात आल्याबद्दल वैष्णव यांनी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande