भूपेंद्र यादव यांनी स्वीकारला पदभार
नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.) : भूपेंद्र यादव यांनी आज, मंगळवारी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालया
भूपेंद्र यादव


नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.) : भूपेंद्र यादव यांनी आज, मंगळवारी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी मिळालेल्या जबाबदारीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, शाश्वत विकासाला पाठिंबा देत देश विकसित भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना विकास आणि पर्यावरण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी मी काम करत राहण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande