गोंदियातील प्रॉपर्टी व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक
गोंदिया, ११ जून, (हिं. स) :- छोटा गोंदिया भागात राहणाऱ्या प्रॉपर्टी व्यवसायिक महेश दखने याची काल सका
गोंदियातील प्रॉपर्टी व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक


गोंदिया, ११ जून, (हिं. स) :- छोटा गोंदिया भागात राहणाऱ्या प्रॉपर्टी व्यवसायिक महेश दखने याची काल सकाळी हत्या करण्यात आली. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

छोटा गोंदिया भागात राहणारा ३४ वर्षीय महेश दखने हा प्रॉपटी खरेदी विक्रीचा व्यवसाय करिता होता. काही कामा निमित्त तो घराजवळून जाणाऱ्या बायपास वर असलेल्या किसान चौक या ठिकाणी थांबला असता चार अज्ञात इसमांनी दुचाकीवरून मागून येत महेशच्या डोक्यावर हातोड्याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी महेशला जखमी अवस्थेत पाहता याची माहिती गोंदिया शहर पोलिसांना दिली.

सामाजिक कार्यकर्ते लोकेश यादव यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी महेश दखनेला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. काल रात्री उशिरा त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. काही तासातच चार आरोपींना अटक केली. देवा कापसे, सुरेंद्र मटाले , मोरेश्वर मटाले , नरेश तरोणे या चार आरोपींनी महेश दखने याची हत्या केली. तर या आधी देखील मृतकावर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल होता. आरोपी विरुद्ध देखील एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांनी दिली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande