विद्यार्थ्यांची 65 टक्के गुण असूनही विज्ञान शाखेलाच पसंती
सोलापूर 11 जून (हिं.स.) दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या
विद्यार्थ्यांची 65 टक्के गुण असूनही विज्ञान शाखेलाच पसंती


सोलापूर 11 जून (हिं.स.) दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या शाखांमध्ये अर्ज केले आहेत. त्याची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी (ता. १८) प्रसिद्ध होणार आहे. दहावीत ६५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही विज्ञान शाखेसाठीच अर्ज केल्याची स्थिती आहे. कला शाखेला विद्यार्थ्यांची फारशी पसंती नसल्याची स्थिती सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ६३ हजार विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत, पण कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील प्रवेश क्षमता ७० हजारांपर्यंत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास त्यांच्या आवडीच्या शाखेतून प्रवेश मिळणार आहे. विज्ञान शाखेसाठी जिल्हाभरात ३२ हजार जागा असून, वाणिज्य शाखेत २३ हजार ५०० आणि कला शाखेची १७ हजारांपर्यंत प्रवेश क्षमता आहे.

दरम्यान, ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’मुळे दहावीतील अनेक विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांवर गुण मिळाले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आपला मुलगा विज्ञान शाखेतूनच शिकावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ‘विनाअनुदानित’चे शैक्षणिक शुल्क भरण्याचीही अनेकांची तयारी आहे. त्यामुळे ‘अनुदानित’च्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर विनाअनुदानितचे मेरिट देखील वाढलेलेच असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande