'नीट' परिक्षेत झालेल्या घोटाळ्याची 'सीबीआय' चौकशी करण्याची मागणी
सोलापूर 11 जून (हिं.स.) वैद्यकीय प्रवेश प्रक्रियाच्या ''नीट-२०२४'' परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची ''सी
'नीट' परिक्षेत झालेल्या घोटाळ्याची 'सीबीआय' चौकशी करण्याची मागणी


सोलापूर 11 जून (हिं.स.) वैद्यकीय प्रवेश प्रक्रियाच्या ''नीट-२०२४'' परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची ''सीबीआय'' मार्फत चौकशी करून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने समन्वयक माऊली पवार यांनी जिल्हाधिकारी कुमार अर्शीवाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.शहर व जिल्ह्यातील आमची मुले १२ वी परीक्षेनंतर गेल्या दोन वर्षापासून ''नीट'' परीक्षेचा अभ्यास केला आहे. वेळ व पैसा गेला आहे, विद्यार्थ्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. असे असताना शासनाकडून नेमण्यात आलेल्या ''एनटीए'' या संस्थेमार्फत मोठा घोटाळा झाला आहे. निष्पाप विद्यार्थी यामध्ये भरडले गेले आहेत. आरोग्य क्षेत्रातील भविष्य ज्यांच्या हातात आहे, त्या लोकांवर या घोटाळ्यामुळे मोठा परिणाम हाेणार आहे. याची उच्चस्तरीय चौकशी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्यात यावी.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande