रत्नागिरी : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ॲपसाठी माहिती पाठविण्याचे आवाहन
रत्नागिरी, 11 जून, (हिं. स.) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण पूरक गणेशमूर्तीना चालना देण
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ


रत्नागिरी, 11 जून, (हिं. स.) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण पूरक गणेशमूर्तीना चालना देण्यासाठी व राज्यातील पर्यावरणपूरक मूर्तिकारांची माहिती राज्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोबाइल ॲप तयार करीत आहे.

या ॲपद्वारे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती नागरिकांना सहज उपलब्ध होतील. तसेच त्यांच्या राहत्या ठिकाणच्या जवळपास त्यांना कुठे या मूर्ती उपलब्ध होतील, याची माहिती मिळू शकेल. या ॲपमुळे पर्यावरणपूरक मूर्तींची जास्तीत जास्त विक्री झाल्यास मूर्ती व्यवसायास गती देता येईल. या ॲपद्वारे मूर्ती हवी असलेल्या नागरिकाला मूर्तिकारांपर्यंत फोनद्वारे थेट संपर्क करता येणार आहे.

हे ॲप फक्त पर्यावरणपूरक मूर्तीसाठीच तयार केला जात असून या मूर्तींव्यतिरिक्त अन्य मूर्तीबाबत यात माहिती मिळणार नाही. मात्र या ॲपमध्ये पर्यावरणस्नेही आभूषणांचादेखील समावेश असणार आहे.

पर्यावरणपूरक मूर्तिकार, कारखानदार यांनी आपली माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आहे. संबंधित माहिती १० जून २०२४ पर्यन्त पाठवावी.

ॲपसाठी अपेक्षित असलेली माहिती अशी : कंपनी/संस्थेचे नाव (FIRM NAME), संस्थापक/मालकाचे नाव (PROPRIETOR NAME), संस्थेचे कार्य आणि माहिती (FIRM INFORMATION AND DESCRIPTION), आस्थापनाचा पत्ता (WORKPLACE ADDRESS), संपर्क क्रमांक (CONTACT NO.), ई-मेल (MAIL ID), वेबसाइट (असल्यास) (WEBSITE IF ANY


 rajesh pande