अतिसार नियंत्रण पंधरवाडा
० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांच्या होणाऱ्या मृत्यु पैकी १० टक्के बालके हे अतिसारामुळे दगावतात आणि ह्या
अतिसार नियंत्रण पंधरवाडा


० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांच्या होणाऱ्या मृत्यु पैकी १० टक्के बालके हे अतिसारामुळे दगावतात आणि ह्या प्रकारच्या बालमुत्युचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमुत्यु शुन्य करणे हे उदिष्ट समोर ठेवुन जिल्हयात आजपासून ते २१ पर्यंतच्या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या अभियानाबाबत माहिती या लेखातून जाणून घेऊ या.

उद्देशः-

१.पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार आजाराच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापन विषयक योग्य वर्तणुक बिंबवणे.

२. अतिसार असलेल्या बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची सुनिश्चिती करणे.

३. सामाजिक व आरोग्य संस्थास्तरावर बालकांमधील अतिसार रुग्णांचे व्यवस्थापन हे स्टॅडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल नुसार होत असल्याबाबतची खात्री करणे.

धोरणः-

१. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरात ओआरएस व झिंकचा वापर तसेच उपलब्धता वाढविणे.

२. अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बालरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे.

३. शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्यसेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी कामगार, स्थलांतरीत मजूर आणि बेघर मुले इत्यादी यासारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे.

४. मागील दोन वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व पाणी पुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र यावर विशेष पुरविणे.

५. आशा स्वयंसेविका या घरोघरी जाऊन सर्व्हे करुन त्यांना ओ. आर. एस. (जलसंजीवनी) व टॅबलेट झिंक वाटप व प्रात्यक्षिक दाखविणे व गरज पडल्यास संदर्भसेवा उपलब्ध करुन देणे.

६. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रा मध्ये ओ. आर. टी. कॉर्नर स्थापन करणे.

मोहिमेसाठी ६० अधिकाऱ्यांचे पथक

या मोहीमेच्या पर्यवेक्षणासाठी एकुण ५१ जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व ९ क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवाड्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जी. एम. कुडलीकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळकृष्ण लांजेवार यांच्या मार्गदर्शनात नियोजन करुन मोहिम राबविण्यात येत आहे.

ही मोहिम राबविण्यासाठी आपल्या घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. अतिसार नियंत्रणात सगळ्यांनी सहयोग द्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande