टी२० वर्ल्ड कप : भारताचे पाकिस्तानसमोर १२० धावांचे आव्हान
* रोहित शर्मा १३, विराट कोहली ४, रिषभ पंत ४२ न्यूयॉर्क, ९ जून (हिं.स.) : आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप
टी२० वर्ल्ड कप : भारताचे पाकिस्तानसमोर १२० धावांचे आव्हान


* रोहित शर्मा १३, विराट कोहली ४, रिषभ पंत ४२

न्यूयॉर्क, ९ जून (हिं.स.) : आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला आज, रविवारी न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. सामन्यापूर्वी पावसाने व्यत्यय आणला होता. मात्र त्यानंतर नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरलं होतं, जे यापूर्वीच्या सामन्यात चित्र दिसलं नाही. यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने पाकिस्तानसमोर १२० धावांचे आव्हान ठेवले आहे. यात भारताचे सर्व गडी बाद झाले.

सामन्यापूर्वी पाऊस असल्याने सामन्यावर अनिश्चिततेचे सावट होते. मात्र पंचांनी मैदानाची पाहणी करून सामना पुढे नेण्याचा निर्णय घेतला. तेथील वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता, तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता नाणेफेक झाली आणि त्यात ८.३० वाजता सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा १३, विराट कोहली ४, रिषभ पंत ४२, अक्षर पटेल २०, सूर्यकुमार यादव ७, शिवम दुबे ३, हार्दिक पांड्या ७, अर्शरदीप सिंग ९, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह शून्यावर बाद झाले.

भारताने आतापर्यंत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सातपैकी सहा सामन्यांत बाजी मारली आहे. पाकिस्तान विरुद्ध विराटने टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ३०८ धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्यातून त्याच्याकडून अपेक्षा होत्या, पण चाहत्यांचा विरस झाला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande