
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज रत्नागिरी रेल्वे स्टेशन, ग्रामीण पोलीस ठाणे, एसटी बस स्थानक, बाजारपेठ येथे जनजागृती करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी नागरिकांना जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार देण्यासंदर्भात आवाहन केले. रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रावर पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी जनतेला केलेली जनजागृतीपर माहिती प्रसारित करण्यात आली. यावेळी उपस्थितांना जनजागृतीपर पत्रके व कार्डचे वाटप करण्यात आले, लाचलुचपतीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. पोस्टर लावण्यात आली. कार्यक्रमात युनिटचे पोलीस निरीक्षक मच्छींद्र जाधव, पोलीस निरीक्षक श्री.रोकडे व सहायक फौजदार श्री. चांदणे, पोलीस हवालदार श्री. नलावडे, श्री. वाघाटे, श्री. पवार महिला पोलीस हवालदार श्रीमती विचारे, श्रीमती धनावडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी