धुळ्यात बनावट नोटांसह आरोपीला अटक
धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी धुळ्यात एकाला शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केल्यानं धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.धुळे तालुका पोलिसांना बनावट नोटा आपल्या सोबत बाळगून असल
धुळ्यात बनावट नोटांसह आरोपीला अटक


धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी धुळ्यात एकाला शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केल्यानं धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.धुळे तालुका पोलिसांना बनावट नोटा आपल्या सोबत बाळगून असल्याचे खात्रीला सूत्रांतर्फे माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून सदर संशयीताला ताब्यात घेतले असता त्याकडे १०० आणि ५०० च्या बनावट नोटा मिळून एकूण २२,२०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. संशयित आरोपी हा विदर्भातील असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले असल्याने मोठे रॅकेट यामागे सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या कारवाईमुळे धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना उघड झाल्याने प्रशासनही सतर्क झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande