
कोल्हापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात नोव्हेंबर हा महाराष्ट्रासह सीमाभागात काळा दिन पाळला जातो. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील सीमा लढ्यातील नेत्यांना कर्नाटक राज्यात येण्यास बंदी घातली आहे. तरीही शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावला निघाले असता त्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला.
आज १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकारने महाराष्टात महाराष्टातील प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उप नेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह जिल्हा प्रमुख, पदाधिकारी यांना कर्नाटक राज्यात प्रवेश बंदीची नोटीस जारी केली आहे. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने मराठी भाषीक सीमा बांधवांना भेटण्यासाठी बेळगावकडे जात असताना त्यांना बेळगाव पोलीसानी नोटीस जारी करून कर्नाटकात प्रवेश करण्यास मज्जाव केला.
खा. धैर्यशील माने
आपले समर्थक आणि शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते घेऊन बेळगावला निघाले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कागल जवळ कोगनोळी टोल नाक्याच्या परिसरात तीन ठिकाणी बॅरीकेट्स लावून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीमा लढ्यातील नेत्यांच्या कर्नाटक प्रवेश बंदीबाबत बेळगाव जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र सरकार, कोल्हापूर पोलिस यांना लेखी सुचना दिल्या होत्या. त्यामुळे खा. धैर्यशील माने यांच्या ताफ्याला कागल पोलीसानी रोखले आणि बेळगावकडे जाण्यास मज्जाव केला. आणि त्यानां कर्नाटक सरकारची नोटीस दिली.यामुळे खा. माने आणि समर्थकांनी महामार्गावरच बैठक मारली.
याबाबत तिव्र नाराजी व्यक्त करत पोलीसांना या कारवाईचा जाब विचारला. ही महाराष्ट्राचे सरकार आणि तमाम जनता सीमावासीयांच्या सोबत आहे. देशातील कोणलाही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही तरीही कर्नाटक शासनाची कृती बेकायदेशीर आणि दडपशाहीची आहे. याबाबत आपण लोकसभेत हक्कभंग दाखल करणार अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर कागल पोलीसांनी खा. माने यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कागल पोलिस ठाण्यात आणले आणिकायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोडून देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar