
धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) आगामी पाच वषारत शिंदखेड्याला स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते आज सकाळी शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोतथान महाभियानंतर्गत शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजना टप्पा क्र २ चे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, माजी सभापती जिजाबराव पाटील, माजी जि प सभापती पंकज कदम, संजीवनी सिसोदे, देविदास बोरसे आदी उपस्थित होते. पुढे पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, शिंदखेडा शहरासाठी २१ कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती त्यानंतर तिचा विस्तार टप्पा क्र २ ही मंजूर करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून या शहराचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना पुरेसा जल पुरवठा होणार आहे. या योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विविध योजनाच्या माध्यमातून नागरिकांना नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. या टप्पा १ अंतर्गत सुकवद येथे तापी नदीच्या काठावर अत्याधुनिक जॅकवेल बांधण्यात आला आहे, या जॅकवेलमधून थेट शिंदखेड्यापयरत मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तसेच शिंदखेड्यात अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यासाठी दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. एकूण ७२ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. शिंदखेडा शहराच्या सवारगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर