आजचा मोर्चा हा ताकद दाखवण्याचा मोर्चा - राज ठाकरे
मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.) - सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपाचे लोक बोलतायत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलतायत. मग निवडणुका घ्यायची घाई का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मतदार याद्या साफ करा, पा
Raj Thackeray


मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.) - सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपाचे लोक बोलतायत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलतायत. मग निवडणुका घ्यायची घाई का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं, हे स्पष्ट होईल. परंतु जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर काम करा, प्रत्येक चेहरा समाजाला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असे आवाहनही ठाकरेंनी केले.

मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि मनसे यांच्या वतीने मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला होता. हा मोर्चा फॅशन स्ट्रीट, मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबला. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांना घेऊन आलोय, असं म्हणत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला. आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. या विषयात सर्वांनीच भाष्य केलं आहे. बोललेले आहेत. तोच विषय नव्याने सांगण्यासारखा असं काहीच नाही. मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही ताकदीने मोर्चाला जमला. छोटे विषय आहे हा. मोठा विषय नाही. आम्ही बोलत आहोत. उद्धव ठाकरे बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत. यात दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्ष बोलत आहे. कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेसचे लोक बोलत आहे. भाजपचे लोकही बोलत आहेत दुबार मतदार आहेत. शिंदेंचे लोकं बोलत आहेत. अजित पवारांचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहे.

पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचं स्पष्ट होईल. सध्या सगळं लपून छपून सुरू आहे. साडे चार हजार मतदार आहेत, जे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमधील आहेत. तिकडच्या मतदारांनी मलबार हिल मतदार संघात देखील मतदान केलेलं आहे. लाखो लोक मतदानासाठी वापरले गेले आहेत. 1 जुलै 2025 च्या तारखेनुसार उत्तर मुंबईत 1739456 यातील 62370 दुबार मतदार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती दिली. मुंबई उत्तर पश्चिम 60231,मुंबई उत्तर पूर्व मध्ये 92983 दुबार मतदार, मुंबई उत्तर मध्ये 63740 दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात 50565, दक्षिण मुंबईत 55205, नाशिक लोकसभा मतदारसंघात 99673 दुबार आणि मावळ 145636 दुबार मतदार आहेत. दुबार मतदार म्हणत राज ठाकरेंनी कागदपत्रांच्या डोंगर दाखवला. याला निवडणुका म्हणतात का? असा सवाल केला. यातून लोकशाही टिकेल का असा सवालही केला. आमदार सांगतो 20 हजार मतं बाहेरून आणली. नवी मुंबईत आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेले. शौचालयात मतदार नोंदवले गेले ही लाजिरवाणी गोष्ट सुरु आहे.

मशीन्सच डेमन्स्टार्शन केलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 232 आमदार विजयी होऊनही राज्यभर शांतता होती. सगळ्यांना जर प्रश्न असेल निवडून आलेल्यांना देखील प्रश्न पडला होता. हा सगळं प्रकार निवडणूक आयोगांमार्फत सुरू आहे. हा मतदारांचा अपमान नाही का? त्यांच्या मताला काय किंमत आहे. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर काम करा. प्रत्येक चेहरा समाजाला पाहिजे. दुबार, तिबार तिथे आले तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असंही ठाकरेंनी म्हटलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande