
कोलकाता, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : राजधानी दिल्लीतील कारस्फोटानंतर देशभरात अलर्ट लागू असून त्याच दरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांनी बीरभूम जिल्ह्यातून 20 हजार जिलेटीन छड्या जप्त केल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ सापरल्याने दिल्ली आणि पश्चिम बंगाल यांचा संबंध शोधण्यात सुरू आहे. तसेच या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे का आणि दिल्लीप्रमाणेच बंगळाला हादरवण्यासाठी काही आतंकवादी षडयंत्र रचले जात होते का ?याचा शोध घेतला जातोय.
पश्चिम बंगाल पोलिसांनी एका पिकअप वॅनमधून 50 पिशव्यांमध्ये भरलेल्या 20 हजार जिलेटीन छड्या जप्त केल्या आहेत. जिलेटीन रॉड हा एक स्वस्त स्फोटक पदार्थ आहे, जो सामान्यतः खाणकाम आणि बांधकाम कामांसाठी वापरला जातो. मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री सापरल्यानंतर बंगळ्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि बस स्थानके, रेल्वे स्टेशन व बाजारासारख्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा कठोर केली गेली आहे. माहितीनुसार वॅन शेजारील बिहार/झारखंड मधील पाकुड़कडून बंगळ्याकडे निघाली होती. मंगळवारी रात्री बीरभूममधील सुलतानपूर-नलहाटी रोडवर तपासणी दरम्यान पिकअप वॅनला थांबवून पाहणी करण्यात आली आणि ही सामग्री जप्त करण्यात आली. या प्रकरणात एक संशयिताला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिस या कोनातून तपास करत आहेत की बीरभूमात जप्त वॅन फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित आहे का ? दिल्लीतील कार स्फोटानंतर सतत आतंकवादी साजिशी बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सावडल्यामुळे संशय अधिक वाढलाय.
पोलिसांनी सांगितले की जिलेटीन छड्या सामान्यतः खाणकाम व बांधकामात वापरल्या जातात, परंतु त्यांच्यापासून सहजपणे स्फोटक उपकरणही बनवता येऊ शकते. त्यामुळे बीरभूममधील जप्तीनंतर संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला असून बसेस, रेल्वे स्थानके आणि मंड्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीरभूममध्ये सापडलेल्या 20 हजार जिलेटीन छड्या केवळ मोठे सुरक्षा आव्हान नाहीत, तर यावरून हा प्रश्नही उपस्थित होतो की एखादी मोठी आतंकवादी साजिश रचली जात होती का. सध्या पोलिस व तपास यंत्रणांद्वारे प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे, जेणेकरून देशाच्या सुरक्षेत आघात घालणाऱ्या आरोप्यांपर्यंत लवकर पोहोचता येईल.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी