निवडणूक प्रचारासाठी भाजपाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
फडणवीस, गडकरी, बावनकुळे, पडळकर आदींचा समावेश मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) - राज्यात २ डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात क
फडणवीस गडकरी बावनकुळे


फडणवीस, गडकरी, बावनकुळे, पडळकर आदींचा समावेश

मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.) - राज्यात २ डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजपाकडून आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

या यादीत चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, प्रविण दरेकर, भागवत कराड, गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ यासह विविध नेते, पदाधिकारी या नेत्यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande