सोन्यात ८२४ रूपयांची घट
जळगाव, 12 नोव्हेंबर (हिं.स.)मागच्या दोन दिवसात सोन्यापाठोपाठ चांदीत मोठी उसळी दिसून आली. मात्र आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच विशेषतः सोन्यात पुन्हा मोठा बदल झाल्याचे दिसून आले.जळगाव शहरामधील सुवर्णबाजारात आज सकाळी सोन्यात ८२४ रूपयांची घट नोंदवली गे
सोनं


जळगाव, 12 नोव्हेंबर (हिं.स.)मागच्या दोन दिवसात सोन्यापाठोपाठ चांदीत मोठी उसळी दिसून आली. मात्र आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच विशेषतः सोन्यात पुन्हा मोठा बदल झाल्याचे दिसून आले.जळगाव शहरामधील सुवर्णबाजारात आज सकाळी सोन्यात ८२४ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे जीएसटीसह १,२७,२०५ रूपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी सोमवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २६ हजार २७८ रूपयांपर्यंत होते.

मंगळवारी दिवसभरात आणखी १७५१ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याच्या दराने एक लाख २८ हजार ०२९ रूपयांपर्यंत मजल मारली होती. मात्र आज घसरण झाली. दुसरीकडे आज चांदी दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ६१ हजार ७१० रूपयांवर स्थिरावले. यापूर्वी सोमवारी चांदीचे दर २०६० रूपयांची तर मंगळवारी तब्बल ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर एक लाख ६१ हजार ७१० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. आज मात्र चांदीचा दर स्थिर आहे.

दरम्यान, डिसेंबरमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थिर डॉलर आणि अमेरिकन बाँड उत्पन्नात घट झाल्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. या वर्षी सोन्याच्या किमती वाढण्यामागे व्याजदर कपातीची अटकळ प्रमुख घटक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande