
तिबिलिसी, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। जॉर्जियामध्ये तुर्कीचे सी-130 लष्करी मालवाहू विमान कोसळून भीषण अपघात घडला आहे.या विमानात २० जण होते. अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नसली तरी विमानातील सर्व २० जवान ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या विमानाने अझरबैजानहून उड्डाण केले होते आणि तुर्की-अझरबैजान सीमेजवळील जॉर्जियाच्या पूर्व काखेती प्रदेशात कोसळले.विमानात तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांचे लोक असू शकतात, परंतु त्यांची संख्या अस्पष्ट आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान डोंगरावर आदळण्यापूर्वी पांढऱ्या धुराचे लोट सोडताना दिसत आहे. अपघातानंतर काळ्या धुराचे लोटही उठताना दिसत आहेत.
तुर्कीचे अध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव यांनी एर्दोगान यांच्याशी चर्चा केली. तुर्की आणि जॉर्जियन दोन्ही सरकारांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode