
मुंबई, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय कर्व्ह एसयूव्ही लाइनअपमध्ये 2026 साली मोठे अपडेट्स आणत ग्राहकांना अधिक लक्झरी आणि फीचर-रिच अनुभव दिला आहे. कंपनीनं या वेळी रिअर-सीट कम्फर्टवर विशेष लक्ष केंद्रित केलं असून, इंटिरियरचं वातावरण आणि केबिनची प्रॅक्टिकलिटी सुधारली आहे. हे सर्व अपडेट्स कर्व्हच्या आयस आणि ईव्ही दोन्ही व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असतील.
नव्या 2026 कर्व्ह एसयूव्हीमध्ये ‘एक्झिक्युटिव्ह कम्फर्ट’ फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, जे प्रीमियम सेगमेंटमधील इन-कॅबिन अनुभव देतात. भारतातील पहिल्यांदाच आर-कम्फर्ट सीट्ससह पॅसिव्ह व्हेंटिलेशन, सेरेनिटी स्क्रीन रिअर सनशेड्स आणि ईझीसिप कप डॉक्स यांसारख्या नव्या सोयी देण्यात आल्या आहेत. याशिवाय, व्हाइट कार्बन फायबर डॅशबोर्ड इन्सर्ट आणि ललितपूर ग्रे इंटिरियर थीमसह नवीन लेदरेट अपहोल्स्टरीमुळे केबिन अधिक प्रशस्त आणि आकर्षक वाटतं. कर्व्ह ईव्ही व्हेरिएंटमध्ये प्योरकम्फर्ट फूटरेस्ट्स आणि एर्गोविंग हेडरेस्ट्समुळे मागील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद झाला आहे.
कम्फर्टबरोबरच क्लायमेट कंट्रोल सिस्टिममध्येही सुधारणा करण्यात आली असून, आता ट्विनझोन एअर कंडिशनिंग सुविधा उपलब्ध आहे. या अपडेट्समुळे टाटा मोटर्स कर्व्हला एक्झिक्युटिव्ह-ग्रेड मिड-साइज एसयूव्ही म्हणून स्थान देत आहे. हे फीचर्स ॲकॉम्प्लिश्ड पर्सोना व्हेरिएंटपासून सुरू होतात, ज्याची किंमत 14.55 लाख रुपयांपासून आहे, तर ईव्ही मॉडेलची किंमत 18.49 लाखांपासून सुरू होते.
टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही टाटानं मोठी झेप घेतली आहे. अॅटलास आणि अॅक्टिव्ह ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित कर्व्हमध्ये 12.3-इंच हार्मन सिनेमॅटिक टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 9-स्पीकर JBL साऊंड सिस्टम, आर्केड.ईव्ही एंटरटेनमेंट स्विट आणि जेस्चर-ऍक्टिव्हेटेड पॉवर्ड टेलगेटचा समावेश आहे. व्हॉइस-ऍक्टिव्हेटेड पॅनोरॅमिक सनरूफ आणि मूड लाइटिंगसह 500 लिटर बूट स्पेस या एसयूव्हीला लक्झरी लुक आणि फॅमिली-फ्रेंडली उपयोगिता देतात.
इंजिन ऑप्शन्समध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनसह मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. कर्व्ह ईव्हीमध्ये 45kWh आणि 55kWh बॅटरीचे दोन पर्याय असून, 500 किलोमीटरपर्यंतची रिअल-वर्ल्ड रेंज दिली गेली आहे. सेफ्टीच्या बाबतीतही कर्व्ह 5-स्टार भारत NCAP रेटिंग आणि लेव्हल-2 ADAS फंक्शनॅलिटीसह बाजारात आली आहे, ज्यामुळे ती आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित एसयूव्ही ठरते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule