सोलापूरात 1 डिसेंबरला महाराष्ट्र व हिमाचल संघात क्रिकेट सामना
सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर १ डिसेंबर रोजी महाराष्ट्रविरुद्ध हिमाचल या संघात क्रिकेट सामना होणार आहे. १९ वर्षांखालील या क्रिकेट संघात कुचबिहारी ट्रॉफीसाठी हा सामना खेळविला जाणार आहे. २८ नोव्हेंबरला दोन
सोलापूरात 1 डिसेंबरला महाराष्ट्र व हिमाचल संघात क्रिकेट सामना


सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।

सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर १ डिसेंबर रोजी महाराष्ट्रविरुद्ध हिमाचल या संघात क्रिकेट सामना होणार आहे. १९ वर्षांखालील या क्रिकेट संघात कुचबिहारी ट्रॉफीसाठी हा सामना खेळविला जाणार आहे. २८ नोव्हेंबरला दोन्ही संघ सोलापुरात दाखल होणार आहेत.राज्याच्या १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात सोलापूरचा समर्थ दोरनाल हा एकमेव खेळाडू आहे. सध्या मैदानावरील काही ठिकाणी गवत सुकलेले तर काही ठिकाणी वाढलेले आहे. खेळाडू घसरून पडू नयेत म्हणून ग्रास कटिंग सुरू आहे. दुसरीकडे विकेटवरील गवत (खेळपट्टी) देखील कटिंग करणे सुरू आहे. ड्रेसिंग रूमची पण स्वच्छता केली जात आहे. कुचबिहारी ट्रॉफीच्या सामन्यापूर्वी आता त्या बाबींवर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी काम करीत आहेत. सोलापूरकरांना हा सामना मोफत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंची राहण्याची, जेवणाची सोय बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. १ ते ४ डिसेंबरपर्यंत हा सामना खेळला जाणार आहे. पार्क स्टेडिअम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात दिल्यापासून डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनकडून दररोज त्याची देखभाल केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande